Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुढच्या वर्षापासून बदलणार NEET-UG परीक्षेचा पॅटर्न? आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

पुढच्या वर्षापासून बदलणार NEET-UG परीक्षेचा पॅटर्न? आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

नवी दिल्ली

NEET-UG परीक्षेच्या पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता या परीक्षेशी संबंधित सर्व सुधारणांना वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षापासून ही परीक्षा पेन-पेपर ऐवजी कॉम्प्युटरद्वारे (संगणकावर) घेण्याची घोषणा केली आहे.

मात्र, या सुधारणांशिवाय परीक्षा अनेक सत्रांमध्ये आणि टप्प्यांमध्ये घेणे, परीक्षेसाठी प्रयत्नांची (Attempts) संख्या निश्चित करणे आणि कमाल वयोमर्यादा ठरवणे यासारखे महत्त्वाचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. आरोग्य मंत्रालय लवकरच या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पुढील वर्षापासून नीट-यूजी परीक्षेत कॉम्प्युटर आधारित चाचणीसह अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

नुकतेच संसदीय समितीसमोर हजर झालेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अधिकाऱ्यांनी, २०२४ मधील पेपर फुटीनंतर डॉ. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी सादर केल्या. या समितीने नीट-यूजी परीक्षेत सुधारणा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला तीन महत्त्वाचे सल्ले दिले होते. यामध्ये परीक्षा ऑनलाईन (कॉम्प्युटरवर) घेणे, ती वेगवेगळ्या सत्रांमध्ये आयोजित करणे आणि उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा व अटेंप्ट्सची मर्यादा निश्चित करणे यांचा समावेश आहे. यातील संगणकावर परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली, तरी इतर निर्णय अद्याप आरोग्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama