मुंबई
शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे. रोहित पवार हे सध्या महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रतिमा एक जननायक किंवा 'हिरो' म्हणून निर्माण करण्याचा उगाचच खटाटोप करत असल्याचा टोला गायकवाड यांनी लगावला.
रोहित पवार हे केवळ दाखवण्यासाठी अजित दादांच्या न्यायाची भाषा करत आहेत, परंतु त्यामागे अजित पवारांची राजकीय जागा आणि त्यांचे पद हडपण्याचा सुप्त हेतू दडलेला आहे, असा थेट आरोप गायकवाड यांनी केला. रोहित पवारांच्या सर्व राजकीय हालचाली या निव्वळ सत्तेच्या महत्त्वाकांक्षेतून आणि अजित दादांचे स्थान मिळवण्यासाठी सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

