Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकऱ्यांच्या  विविध प्रश्नसंदर्भात नेवासातील शेतकऱ्यांचे सुजय विखे पाटील यांना साकडे...

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नसंदर्भात नेवासातील शेतकऱ्यांचे सुजय विखे पाटील यांना साकडे...

नेवासा प्रतिनिधी

प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष मा.खा.सुजय दादा विखे पाटील काल नेवासात कार्यक्रमानिमित्त आले असता खोलेश्वर मंदिर नेवासा शहर येथे प्रवरा नदीवरील बंधारा कृती समिती व शेतकऱ्यांच्या वतीने प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भरून मिळावे व नेवासा तालुक्यात होत असलेल्या रासायनिक खताचा कृत्रिम टंचाई यावर लक्ष घालून शेतकऱ्यांना मुबलक खताचा साधा उपलब्ध करावा व या मधील दोषी कृषी विभागाच्या त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी लेखी निवेदन देण्यात आले.

सध्या नेवासा परिसरात कडक उन्हाळ्या मुळे बंधारे तील पाणी साठवून क्षमता खूप कमी झाली असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बंधारा कृती समिती व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तात्काळ नदीवरील बंधारे भरून द्यावे अशी मागणी केली त्याचबरोबर शेतकऱ्यांची सध्या ऊस मेहनती, खरीप पूर्व हंगामी मशागतीसाठी रासायनिक खताचा गेल्या अनेक दिवसापासून तुटवडा तालुक्यात भासत आहे परंतु कागदोपत्री मात्र खताचा मोठा साठा नेवासा तालुक्यात असल्याचे फक्त कागदावरच दिसत आहे. परंतु शेतकरी खतासाठी भटकंती करताना तालुक्यात दिसत आहे अनेक तक्रारी करून देखील कृषी विभागाकडून अद्याप पर्यंत सेवा केंद्र वर एकही कारवाई नाही. याची तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया व इतर रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करून यामध्ये असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करायची मागणी याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.

या संदर्भात बोलताना युवा नेते सुजय दादा विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली. लवकरच शेतकऱ्याच्या या दोन्ही प्रश्न बाबतीत तात्काळ कारवाई करू असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. याप्रसंगी नेवासा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज पारखे, बंधारा कृती समितीचे संजय गायके सुनील व्यवहारे ,पिंटू बोरकर डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे ,संजय गवळी, अविनाश जोशी, सुनील हारदे, राजेश कडु अशोक ताके ,संजय लोखंडे तानाजी गायकवाड,दिलीप दिघे, सुमित घुले,मोहन गवळी आदी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama