Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेवगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक व गोमांस प्रकरणी मोठी कारवाई

शेवगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक व गोमांस प्रकरणी मोठी कारवाई

शेवगाव

शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक व गोवंश जनावरांच्या गोमांस विक्रीप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत सुमारे ५ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मळेगाव शिवारातील ढोरा नदी परिसरात ट्रॅक्टरद्वारे चोरीछुप्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून भागवत लक्ष्मण गर्जे (वय ४२, रा. मळेगाव, ता. शेवगाव) याला ताब्यात घेतले. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर, ३० हजारांची डम्पिंग ट्रॉली आणि १० हजार रुपये किमतीची एक ब्रास शासकीय वाळू असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर १५ मे रोजी सकाळी सम्राट अशोकनगर परिसरात एका घराच्या मागील बाजूस गोवंश जनावरांचे गोमांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून मोहंम्मद कैफ फय्याज सौदागर (वय २४, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव) याच्या घरामागील जागेत गोवंश जनावरांचे अवशेष व मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. पोलिसांनी सुमारे २०० किलो गोमांस, धारदार सुऱ्या व तराजू असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ आबासाहेब गोरे व पोहेकॉ संदीप आव्हाड हे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama