Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेवगावच्या राजकारणात 'राजकीय भूकंप'; भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचे सुपुत्र ठाकरे शिवसेनेत!

शेवगावच्या राजकारणात 'राजकीय भूकंप'; भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचे सुपुत्र ठाकरे शिवसेनेत!

शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जगदंबा भक्त दिनेश आबा लव्हाट यांचे जेष्ठ पुत्र, आ ॲड. अक्षय कर्डिले यांचे साडू आणि इनोव्हेटिव्ह डिझाईनर्स अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंजि.

अजिंक्य डी. लव्हाट यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, सर्वसाधारणपणे विरोधी पक्षातील कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाकडे वळताना दिसतात. मात्र या वेळी चित्र उलटे पाहायला मिळाले. भाजपच्या प्रभावशाली कुटुंबातील सदस्याने ठाकरे शिवसेनेची वाट धरल्याने शेवगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

पक्षप्रवेशानंतर इंजि. अजिंक्य लव्हाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "शेवगाव तालुक्यात सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही पदाचा मोह नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेन."

कौटुंबिक भूमिकेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, "माझ्या निर्णयाला वडिलांचा आशीर्वाद आहे. मात्र ते भाजपमध्येच कार्यरत असून, त्यांच्या राजकीय भूमिकेचा आणि माझ्या निर्णयाचा संबंध नाही."

नगर येथे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, उदय गांगुर्डे, शिवाजी मडके, कानिफ कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama