Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ११ उमेदवारांची अधिकृत घोषणा; पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी प्राजक्त तनपुरेंना मोठी उमेदवारी

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ११ उमेदवारांची अधिकृत घोषणा; पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी प्राजक्त तनपुरेंना मोठी उमेदवारी

मुंबई

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अखेर यशस्वीपणे मिटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने आपल्या हिस्सेदार पक्षांशी चर्चा करून ११ जागांवर उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

या नवीन जागावाटपानुसार भाजपा स्वतः ११ जागा लढवणार असून शिवसेना शिंदे गट ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागांवर आपले नशीब आजमावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या या यादीत सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून नुकताच भाजपात जाहीर प्रवेश केलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पक्षाने थेट अहिल्यानगर मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे ३० मे रोजी त्यांनी अधिकृतपणे भाजपचा झेंडा हाती घेतला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारीची मोठी लॉटरी लागली आहे. भाजपाच्या या अधिकृत यादीत अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, भंडारा-गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रविण पोटे पाटील, सांगली-साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, नांदेडमधून अमर राजूरकर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखानी, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जागावाटपाचा हा कळीचा मुद्दा सुटल्यामुळे आता महायुतीने या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून विजयासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama