Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

Kiran Hegde Live 6 days ago

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी १६ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लीटरमागे तीन रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा ही दरवाढ झाली आहे.

आजपासून नवी दिल्लीत पेट्रोल ९८.६४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९१.५८ रुपये प्रति लीटर असेल. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लीटर याप्रमाणे असतील.

दिल्ली- ९८.६४ आणि ९१.५८

मुंबई- १०७.५९ आणि ९४.०८

बेंगळुरू- १०७.१२ आणि ९५.०४

चेन्नई- १०४.४६ आणि ९६.११

कोलकाता- १०९.७०आणि ९६.०७

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live