Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

Kiran Hegde Live 3 weeks ago

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक छायाचित्र आणि क्यूआर कोड असू शकतो, अशा आशयाच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. समाजमाध्यमावरही तशा स्वरूपाच्या पोस्ट फिरत आहेत. हे लक्षात येताच प्राधिकरणाने हे स्पष्टीकरण दिले आहे. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. अशाप्रकारे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही. अशाप्रकारच्या सर्व बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट्समुळे नागरिकांच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण होत आहे, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.

नागरिकांनी अशा बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट्सकडे दुर्लक्ष करावे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमावर जारी होणाऱ्या निवेदनांवरच नागरिकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live