Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

Kiran Hegde Live 1 week ago

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार समुदाय पोहोच (Outreach) शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली.

या शिबिरांचा मुख्य उद्देश स्थानिक व वंचित समुदायातील नागरिकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ आधार संबंधित विविध सेवांची सुसुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे हा होता. UIDAI ने डिजिटल समावेशन आणि नागरिक सुलभता यांना प्राधान्य देत अशाप्रकारच्या समुदाय-आधारित उपक्रमांद्वारे आधार सेवांना अधिक सर्वसमावेशक स्वरूप दिले आहे.

शिबिरांमध्ये होता या प्रमुख सेवांचा समावेश:

- लहान मुलांची नवीन आधार नोंदणी

- डेमोग्राफिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी) अद्ययावतीकरण

- मोबाईल नंबर लिंकिंग व अपडेट

- बायोमेट्रिक अपडेट (हातांचे ठसे व आयरिस स्कॅन)

या सर्व प्रक्रिया UIDAIच्या कठोर सुरक्षा नियमावली, पडताळणी प्रोटोकॉल आणि गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करून पार पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे, या शिबिरांमध्ये लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक बालकांनी प्रथमच आधार नोंदणी व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण केले. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आधार सेवा घराजवळ उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी UIDAIच्या ASK वाशी केंद्र, NHRC आणि TISSच्या टीमचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. UIDAI सर्व नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल ओळख सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live