Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

Kiran Hegde Live 1 week ago

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले.

या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते. यावेळेची त्यांची कामगिरी खूपच सरस झाली. गौरव यांनी आपले सुवर्णपदक काका, दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांना समर्पित केले आहे.

स्लिंगशॉट, म्हणजे आपली भारतीय बेचकी, हिला आता आंतरराष्ट्रीय खेळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. २०१८ साली इटलीमध्ये पहिली वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या खेळात खेळाडूंना विशिष्ट अंतरावर ठेवलेल्या लक्ष्यावर म्हणजे टार्गेटवर अचूक नेम लागण्यासाठी सराव करावा लागतो. यामुळे एकाग्रता आणि अचूकता वाढीस लागते. सध्या चीन, इटली, स्पेन, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, अमेरिका, ब्राझील, व्हिएटनाम आणि भारतासह ३६हून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीनेसुद्धा, वर्ल्ड स्लिंगशॉट असोसिएशन आणि वर्ल्ड स्लिंगशॉट फेडरेशन यासारख्या संघटना प्रयत्न करीत आहेत. स्पेन आणि त्यानंतर थायलंडमध्ये पुढील वर्ल्डकप स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live