Sunday, 24 Jan, 9.55 am KOKAN NOW

होम
भाजप युवा मोर्चा कुडाळ तालुका उपाध्यक्षपदी तन्मय वालावकर यांची नियुक्ती

​​भाजप जिल्हा​ ​अध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

​​कुडाळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी नुकतीच ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.​ ​त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुक्याची उर्वरित कुडाळ तालुका युवा मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.​ ​माजी मुख्यमंत्री नारायण राणे,​ ​माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण,​ ​माजी खासदार प्रदेश सचिव निलेशजी राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार कुडाळ तालुका युवा मोर्चा उपाध्यक्षपदी तन्मय विश्वास वालावलकर यांची निवड करण्यात आली​. भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,​ ​भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,​ ​युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री,​ ​आनंद शिरवलकर,​ ​कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे,​ ​सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,​ ​जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.​​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top