Saturday, 23 Jan, 9.29 am KOKAN NOW

होम
भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका चिटणीस पदी विश्वास पांगुळ यांची वर्णी

​​भाजपा युवा मोर्चाच्या आयोजित जिल्हा कार्यकारणीमध्ये देण्यात आले नियुक्ती पत्र

​​ कुडाळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी ​शुक्रवार दि. २२ जाने. रोजी ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.​ ​त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुक्याची उर्वरित कुडाळ तालुका युवा मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.​ ​माजी मुख्यमंत्री नारायण राणे,​ ​माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण,​ ​माजी खासदार प्रदेश सचिव निलेशजी राणे,​ ​आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार कुडाळ तालुका चिटणीसपदी विश्वास सखाराम पांगुळ यांची निवड करण्यात आली​.​ त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात NSUI तसेच स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केली होती​.​ त्याच्या कामाचा आढावा घेत कुडाळ तालुका युवा मोर्चा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले​.​ त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,​ ​भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,​ ​युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री,आनंद शिरवलकर,​ ​कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे,​ ​सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,​ ​जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.​​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ. ​ ​​

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top