Saturday, 23 Jan, 9.46 am KOKAN NOW

होम
भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी अवधूत सामंत यांची निवड

​​भाजपा जिल्हाअध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

कुडाळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी शुक्रवार २२ जाने. रोजी ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाची उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार प्रदेश सचिव निलेशजी राणे,आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस पदी अवधूत दत्तात्रय सामंत यांची निवड करण्यात आली व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री, आनंद शिरवलकर, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.​

​ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ. ​ ​​

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top