Saturday, 23 Jan, 12.54 pm KOKAN NOW

होम
चिंदर, आडवली येथील नूतन ग्रा.पं.सदस्यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

​मालवण ​: ​​मालवण तालुक्यातील चिंदर व आडवली ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. नूतन ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
चिंदर गावडेवाडी येथे नूतन ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, रिया घागरे, नम्रता महंकाळ, जान्हवी घाडी, निलेश रेवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मालवण नगरसेवक मंदार केणी, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, शिवोद्योगचे मालवण तालुकाप्रमुख मंगेश गावकर, समीर हडकर, संदीप पारकर, बाबा हडपी, बाबू वळंजू,​ ​प्रसाद टोपले, संजय सामंत, शेखर पालकर, रघुनाथ घागरे, सतीश हडकर, स्मिता जाधव, उर्मिला मालवणकर, मिलिंद चिंदरकर आदी उपस्थित होते. आडवली ग्रा. प.चे नूतन सदस्य संदीप आडवलकर, सुनील जाधव, भक्ती साटम, सोनाली पराडकर, स्वप्नील लाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख अरुण लाड, विभागप्रमुख दीपक राऊत, दक्षता समिती सदस्य बंडू चव्हाण, युवासेना विभाग प्रमुख बंडू गावडे, दुलाजी परब, सुभाष धुरी,बाळा परब, विठ्ठल घाडी, विष्णू घाडी, शा. प्र. दीपक घाडी, अर्जुन घाडी, राजू पराडकर, संदेश मालंडकर, सिद्धार्थ कदम, मोहन लाड, आदी उपस्थित होते.​​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण. ​ ​​

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top