Friday, 22 Jan, 5.50 pm KOKAN NOW

होम
ग्रामपंचायत निवडणुकांमधील भाजपाच्या यशाचे खरे शिल्पकार तालुकाध्यक्ष

कणकवली : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोकणाकडे लक्ष केंद्रीत केले असून या नेत्यांच्या माध्यमातून कोकणातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या यशाचे शिलेदार भाजप मंडल पदाधिकारी आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा बँक, जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणूका भाजप एकहाती जिंकणार आहे.शिवसेनेवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही हे ग्रामपंचायत निवडणूकित स्पष्ट झाले असून सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही शतप्रतिशत भाजप करणार असल्याचे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील लोकांचा आता सत्ताधारी शिवसेनेवर विश्‍वास राहिलेला नाही. म्हणूनच ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला नाकारून जनता भाजपच्या पाठीशी राहिली आहे. येत्या काळात जिल्हा बँक, जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणूका भाजप एकहाती जिंकणार आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचेही कोकणकडे लक्ष असून सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही शतप्रतिशत भाजप करणार असल्याचे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. सिंधूदुर्गातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील भाजपच्या सर्व मंडल अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्यानंतर मंडळ अध्यक्षांचा जिल्हा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आम. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, चिटणीस प्रसन्ना देसाई, राजू राऊळ, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, वैभववाडी मंडल तालुकाध्यक्ष नासिर काझी, मालवण मंडल तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी मंडल तालुकाध्यक्ष अजय गोंदावळे, कणकवली मंडल तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, कुडाळ मंडल तालुकाध्यक्ष विनायक राणे, आंबोली मंडल तालुकाध्यक्ष संदीप गावडे, देवगड मंडल तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, कणकवलीचे सभापती मनोज रावराणे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि ज्येष्ठ नेते अजित गोगटे यांच्या हस्ते मंडल अध्यक्षांचा तसेच कणकवलीचे नवनिर्वाचित सभापती मनोज रावराणे यांचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणूक यशाबद्दल सिंधुदुर्ग भाजपचे कौतुक केले आहे. या यशाचे खरे शिलेदार हे सर्व तालुका मंडल अध्यक्ष आहेत. आंबोली, चौकुळ, मळगावसह अनेक ग्रामपंचायती शिवसेनेकडे होत्या त्या आता भाजपकडे आल्या आहेत. सावंतवाडीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपचा विजय हा टीमवर्कचा विजय आहे. सर्व नेतेमंडळींचे मार्गदर्शन, सर्व मंडल अध्यक्षांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. मंडल तालुकाध्यक्षांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला असला तरी 27 रोजी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असून खा. नारायण राणे व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व मंडल तालुकाध्यक्षांचा मोठा सत्कार केला जाणार आहे. आजच्या बैठकीत सर्व मंडल अध्यक्षांच्या अडचणी समजून घेतल्या. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत जि. प. च्या 50 पैकी 50 तर पं. स. च्या 100 पैकी 100 जागा जिंकण्याचा निर्धार केला. शिवसेना नेते कोकणसाठी काही करू शकले नाहीत, यासाठी आपण त्यांना धन्यवाद देतो. चांदा ते बांदा योजना बंद करण्यात आली, नियोजन आराखडा 225 कोटींवरून 142 कोटींवर आणण्यात आला, निसर्ग चक्रीवादळ तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. पालकमंत्री, खासदार, सत्ताधारी आमदार जिल्ह्यात फिरूनही शिवसेनेला लोकांनी नाकारले आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. सिंधुदुर्गात भाजपची आता यशस्वी घोडदौड सुरू झाली असून येत्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातही शतप्रतिशत भाजप करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून पुढील खासदार आणि तिन्ही आमदार हे भाजपचेच असणार आहेत. आतापर्यंत 45 ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली तर सरपंचांची संख्या निश्‍चितच वाढेल असा विश्‍वास राजन तेली यांनी व्यक्‍त केला.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top