Sunday, 24 Jan, 12.08 pm KOKAN NOW

होम
कोंडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांची अखेर मुक्तता

​​२५ दिवस कोंडलेल्या स्थितीत

​​कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचा पुढाकार

​​कुडाळ : कडावल ग्रा.पं. मालकीच्या आणि कडावल येथील आरोग्य केंद्रनजीक असलेल्या इमारतीचे कुलूप शनिवारी सायंकाळी फोडून पंचवीस दिवस आत कोंडले गेलेल्या दोन कुत्र्यांची सुटका करण्यात आली. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमने यासाठी पुढाकार घेतला.
कडावलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या बंद धर्मशाळेत दोन श्वानाची पिल्ले ३०​ ​डिसेंबर पासुन २५ दिवस कोंढलेल्या अवस्थेत आहेत या धक्कादायक प्रकाराची कडावल ग्रामपंचायतने कोणतीही दखल घेतली नाही याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग या प्राणीमात्रांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळताच संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर, सदस्य दिवाकर बांबर्डेकर, सिध्येश ठाकुर, विजय कदम यांना लागताच घटना स्थळी पोहचत पोलिस पाटलांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सदर घटनेची माहीती कडावल गावच्या प्रथम नागरिक सरपंच स्नेहा ठाकुर यांना दुरध्वनी वरुन दिली असता त्यांच्याकडुन समाधानकारक उत्तर न येता टीमला ३ तास तात्कळत रहावं लागलं होत. त्यामुळे सदर टीमने पुढचा निर्णय घेत आवळेगाव पोलिस दुरक्षेत्र गाठले. पोलिसठाण्याचे अंमलदार झोरे यांच्याशी सदर घटनेची चर्चा करुन लेखी निवेदनाद्वारे याबाबत मदत मागण्यात आली.​ ​घटनास्थळी पोलिस आल्यानंतर गावचे पोलिस पाटील यांना बोलवुन ग्रा.पं सदस्यामार्फत सदर ईमारतीच्या दरवाजाचे कुलुप तोडण्यात आले आणि कोंडलेल्या श्वानांची मुक्तता करुन नंतर खाऊ पिऊ घालुन सोडण्यात आले.
एव्हढे करुन झाल्यावर सुद्धा सरपंचानी संबंधित घटनेची माहीती घेण्याची तसदीसुध्दा घेतली नाही. याबाबत संस्थेने सरपंच स्नेहा ठाकुरांबाबत नाराजी व्यक्त केली.
२५ दिवस त्या श्वानांची काळजी सहदेव तांबे यांच्या कुटुंबियानी घेतली. संस्थेकडुन पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार मानण्यात आले.​ ​आणि जनतेना आव्हाहन करण्यात आले की​,​ कोणताही प्राणी अथवा पक्षी संकटात आढळल्यास संस्थेशी संपर्क करावा​.​
यावेळी आवळेगाव पोलिस ठाण्याचे चव्हाण, गावचे पोलिस पाटिल सोमा सावंत, आरोग्य विभाग शिपाई जंगले ग्रा.पं​.​ सदस्य बाळकृष्ण ठाकुर, शीला गुरव आ​दी उपस्थित होते.​​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top