होम
रोटरी क्लब मुंबई च्या वतीने वेंगुर्ला मध्ये ४ व्हीलचेअर चे वाटप

वेंगुर्ला : रोटरी क्लब मुंबई गोरेगाव वेस्टच्या वतीने वेंगुर्लामध्ये चार व्हीलचेअर चे वाटप शुक्रवारी दिनाक २२ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यातील १ व्हीलचेअर एस.टी. डेपो वेंगुर्ला येथे देण्यात आली. तसेच प्रसाद पालव, शबीना शेख, रमेश गोहर या तीन अपंग बांधवांसाठी व्हीलचेअर देण्यात आले. गोरेगाव रोटरी क्लब गेली आठ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अपंग बांधवांसाठी मेळावे आयोजित करून व्हीलचेअर आणि इतर साहित्य वाटप करते. आतापर्यंत पाचशेहून अधिक व्हीलचेअर गोरेगाव रोटरी क्लब मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाटप झालेले आहेत, गोरेगाव रोटरी क्लबला जे.एस.डब्ल्यू फाउंडेशन कडून व्हीलचेअर मिळतात आणि असेच जे. एस.डब्ल्यू चे संस्थापक कै. ओम्रकाश जिंदाल यांचे स्मृतिप्रीत्यर्थ या व्हीलचेअर चे वाटप केले जाते. तसे आपल्या रोटरी क्लब मार्फत यापुढेही जिल्हातील अपंग बांधवांना असे साहित्य वाटप केले जाईल असे आश्वासन पुष्कराज कोले यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव रोटरी क्लबचे पुष्कराज कोले व बापू गिरप यांनी केले, बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष अपंग महासंघ यानी विशेष मेहनत घेऊन गरजू अपंगाची माहिती गोळा केली तसेच रोटरी क्लब मीडटाऊन वेंगुर्ला या रोटरोंक्ट क्लबने एसटी डेपो वेंगुर्ला यांच्याशी संपर्क साधून प्रवासात प्रवाशांच्या सोयीसाठी एक व्हीलचेअरची मागणी केली. होती ही मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली. सर्वांच्या सहकार्याबद्दल रोटरी क्लब मुंबई गोरेगाव च्या वतीने धन्यवाद देण्यात आले.
वैभव गावडे, कोकण नाऊ, वेंगुर्ला