Saturday, 23 Jan, 10.52 am KOKAN NOW

होम
विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्यात येतील - वैभव नाईक

मालवण येथील प्राथमिक, माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन, ऑक्सीमीटरचे वाटप

आ. वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून उपक्रम

मालवण : कोरोनाचे नियम व अटी पाळून टप्प्याटप्याने शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने शाळेच्या प्रवेश द्वारावर शिक्षक विद्यार्थी तसेच शाळेस भेट देणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार आहे. ही तपासणी सुलभरित्या व्हावी अडचणी येऊ नयेत यासाठी कुडाळ मालवणमधील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी शिक्षक विद्यार्थ्यांनी पूर्ण काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्यात येतील. अन्य काही अडचणी असतील त्या निसंकोचपणे सांगा त्या नक्कीच मार्गी लावू अशी ग्वाही कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मलगन व ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आले. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. आमदार वैभव नाईक यांच्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
जि.प. सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जि. प. सदस्या माधुरी बांदेकर यांनी मनोगत व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जि.प. सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि. प. सदस्या माधुरी बांदेकर, नगरसेवक मंदार केणी, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, अशोक बागवे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, यांसह मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KOKAN NOW
Top