चालू घडामोडी
देशभरात 'इतक्या' लाख जणांचे लसीकरण; महाराष्ट्र पिछाडीवर

नवी दिल्ली - देशभरात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. आत्तापर्यंत, देशात जवळपास १४ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. गेल्या २४ तासांत तीन लाख ४७ हजार ५८ जणांनी लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६ हजार २४१ सत्रांत ३ लाख ४७ हजार ५८ जणांनी लस घेतली. आत्तापर्यंत लसीकरणाची अशी २४ हजार ४०८ सत्रे पार पडली आहेत. शनिवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ लाख ९० हजार ५९२ जणांनी देशव्यापी लसीकरण मोहिमेत लस घेतली.
कोरोना लसीकरणात कर्नाटकने बाजी मारली आहे. तिथे १ लाख ८४ हजार ६९९ जणांनी लस घेतली. त्यानंतर, आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. या राज्यात १ लाख ३३ हजार २९८ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर, ओडिशा (१,३०,००७) आणि उत्तर प्रदेश (१,२३,७६१) ही राज्ये लसीकरणात आघाडीवर आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रात मात्र लसीकरणाची गती संथ आहे. आत्तापर्यंत, ७४,९६० जणांनी लस घेतली.
https://t.co/LfiWFXlu9b
- Agrowon E Gram (@Agrowonegram) January 24, 2021
अमेरिकेकडून भारताचे कौतुक, म्हणाले.@MarathiBrain @MarathiRT
सर्वाधिक लसीकरणाची राज्ये
१) कर्नाटक - १,८४,६९९
२) आंध्र प्रदेश - १,३३, २९८
३) ओडिशा - १,३०,००७
४) उत्तर प्रदेश - १,२३, ७६१
५) तेलंगण - १,१०,०३१
६) महाराष्ट्र - ७४,९६०
७) बिहार - ६३,६२०
८) हरियाना - ६२,१४२
सक्रिय रुग्णसंख्येत आणखी घट
दरम्यान, देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येचा घटता आलेख शनिवारीही कायम होता. शनिवारी देशभरात कोरोनाचे १८ लाख पाच हजार ६६२ रुग्ण होते. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी केवळ १.७४ आहे.