Monday, 13 Jul, 11.30 am ॲग्रोवन ई-ग्राम

चालू घडामोडी
एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी महामंडळाच्या जवळपास 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना 20 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर जावा, असे आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत. या काढण्यात आलेल्या आदेशाची काही जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यास सुरूवात झाली असल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. कर्मचारी संघटना इंटकने या निर्णयाचा विरोध करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

याबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, "सध्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा संकटाच्या काळात ही एसटी महामंडळाचे कर्मचारी काम करत आहेत. परंतु अचानक एसटी महामंडळाकडून जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगितल आहे. तसे आदेश देखील देण्यात आले आहेत."

सध्या राज्यात एसटी महामंडळात तब्बल 1 लाख 5 हजार सदस्य आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी महामंडळाला प्रत्येक महिन्याला 249 कोटी द्यावे लागतात. सध्या कर्मचाऱ्यांनी 20 दिवस सक्तीचे रजेवर जावा असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, शासनाने दिलेल्या आदेशाबाबत कर्मचाऱ्यांचे पगार कपात करू नये, असे सांगितले आहे. यामुळे जरी कर्मचाऱ्यांना 20 दिवसांची सक्तीची रजा देण्यात आली असली, तरी त्यांना या दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे, असंही त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushiking
Top