Monday, 13 Jul, 4.30 pm ॲग्रोवन ई-ग्राम

होम
पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी करणार सरपंचांची नियुक्ती

ई ग्राम : अखेर ग्रामविकास विभागाने निर्णय घेऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश काढले आहे. सदरचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता आमदारांसह पालकमंत्री यांच्या मर्जीतील व्यक्तीची या पदावर नियुक्ती होणार असून गावगाड्यात पुन्हा गटबाजीला उधाण येऊ शकते.

राज्यातील एप्रिल ते जून मध्ये मुदत संपलेल्या १ हजार ५६६ तर जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींवर कलम ३५ नुसार विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. तर जुलै ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील १२ हजार ६६८ व जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमला जाणार आहे.

कलम ३५ मध्ये अनेक तांत्रिक अडथळे असल्याने शासनाने यात दुरुस्ती केली आहे. मात्र नव्या अध्यादेशात शासनाने योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी असे म्हटल्याने प्रशासनासह सरपंच व जनतेमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. राज्यशासन म्हणजे कोण आणि योग्य व्यक्ती म्हणजे कोण याचे उत्तर सापडत नसल्याने आता पुना जिल्हा परिषदांनी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पालकमंत्री व आमदारांचे बैठका होऊन सरपंच नियुक्तीवर खलबते झाली होती. त्यामुळे असाच निर्णय घेणार अपेक्षित होते. त्यानुसार आता अधिकृतपणे निर्णय आला आहे. आता जिल्ह्यात जेथे राष्ट्रवादीची सत्ता आहे तेथे राष्ट्रवादीचा तर शिवसेनेची सत्ता आहे तेथे शिवसेनेचा व काँग्रेसची सत्ता असलेल्या ठिकाणी काँग्रेस सरपंच होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक तालुक्यात मर्जीतील पदाधिकाऱ्यांना या नावांवर शिक्कामोर्तब करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ही नावे पालकमंत्र्यांकडे आल्यानंतर अंतिम होतील. पालकमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नावे गेल्यावर सरपंच नियुक्तीचे आदेश निघणार आहे.

पालकमंत्री किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नेमणूकीचे आदेश दिले जात आहे. मात्र गावाची काडीमात्र माहिती नसलेले हे अधिकारी योग्य व्यक्ती कशी निश्चित करणार हा प्रश्न आहे. यामुळे वशिल्याने नावे निच्छित होऊन वाद होतील.गावात तीन महिन्यापासून सुरू असलेली शांततेचा भंग होईल. सध्या सत्तेत असलेल्या सरपंचाकडे बहुमत असल्याने त्यांच्याशी संलग्नित व्यक्तीला अथवा कोरोना काळात चांगले काम केलेल्या विद्यमान सरपंचानाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे."

नवनाथ लभडे,माजी सरपंच,निमगाव मढ

प्रशासक नेमल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushiking
Top