Wednesday, 05 Aug, 10.11 am कृषीरंग

राष्ट्रीय
भाजपा, संघाच्या नेत्यांच्या मुखात मात्र कायम 'मरा मरा'; 'त्यांची' टीका

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रीतही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२.३० वाजता मोदींच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होईल. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजप आणि रा.स्व.संघावर निशाणा साधला.

'राम' या दोन ‌शब्दांच्या जपाने वाल्या कोळीचे महर्षी वाल्मिकी झाले. पण भाजपा व संघाच्या नेत्यांच्या मुखात मात्र कायम "मरा मरा" असेच निघत राहते', अशी जळजळीत टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

'मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपामध्ये बहुसंख्य "अमर्यादा पुरुषोधम" आहेत, असाही टोला त्यांनी भाजप नेत्यांना हाणला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushirang
Top