Monday, 13 Jul, 4.08 pm कृषीरंग

राष्ट्रीय
करोना उपचारासाठीचे रेटकार्ड पहा; त्यापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांकडे ठेवा लक्ष

करोना विषाणूमुळे कोविड १९ आजार झाल्यास त्यांच्या उपचारासाठीचे भाव ठरलेले आहेत. त्यापेक्षा जास्त जर कोणत्याही रुग्णालयाने यासाठी पैसे घेतले आणि त्याची तक्रार करण्यात आली तर संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, कारवाईबाबत अजूनही ठोस धोरण जाहीर झालेले नाही.

अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी याबाबत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशनमध्ये जर रुग्ण असेल तर प्रतिदिवशी ४ हजार रुपये शुल्क घ्यावे. आयसीयूमध्ये रुग्ण असेल आणि त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसेल तसेच आयसोलेशनमध्येही असेल तर प्रतिदिवशी ७ हजार ५०० रुपये रुग्णालये घेऊ शकतात. मात्र, आयसीयू वॉर्ड (व्हेंटिलेटरसह) आणि आयसोलेशन यासाठी प्रतिदिवशी ९ हजार रुपये शुल्क आकारावे लागेल.

यामध्ये पीपीई कीट, व्रान्कोस्कोपीक प्रोसीजर्स,बायोप्सीज, असायटीक/प्युरल टॅपिंग, सेंट्रल लाईन इन्सर्शन, केमोपोर्ट इन्सर्शन आदींच्या दर आकारणीचा समावेश नसल्याने त्यासाठी मात्र रुग्णांना अधिकचे पैसे द्यावे लागतील. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushirang
Top