Saturday, 19 Sep, 10.50 pm कृषीरंग

औरंगाबाद
म्हणून शेतकऱ्यांनी दिली 'भारत बंद'ची हाक; मोदी सरकारच्या निर्णयाला संघटनांचा जोरदार विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आता देशभरातील प्रमुख संघटना आणि शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डीनेशन कमिटी All India Kisan Sangharsh Coordination Committee (AIKSCC) यांनी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी बंदची हाक दिली आहे.

मोदी सरकारमधील मंत्रिपद सोडून अकाली दल या राजकीय पक्षाने हे विधेयक शेतकरी आणि गरिबांच्या विरोधातील व श्रीमंतांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. एकूणच यामुळे देशभरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.मोदींनी यावर बोलताना विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.

हे क्रांतिकारी स्वरूपाचे विधेयक असल्याचा दावा भाजपकडून होत असतानाच काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांनी याला शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले आहे. पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी याच्या विरोधात मोठी आंदोलने केली होती. पोलिसांनी त्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. अशा पद्धतीने या विधेयकावर दोन्ही बाजू आपापले विचार आग्रहाने मांडत आहेत.

पंजाब येथील युथ कॉंग्रेसने याच्या विरोधात २० सप्टेंबरला ट्रॅक्टर रॅली आयोजित केली आहे. तसेच इतर पक्ष आणि संघटनांनी २५ सप्टेंबर रोजीच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ट्विटरवर #25सितम्बर_भारतबंद हा ट्रेंड चालवला जात आहे. या ट्रेंडला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushirang
Top