Tuesday, 11 Aug, 7.08 pm कृषीरंग

राष्ट्रीय
तर लॅपटॉप, कपडे, कॅमेऱ्यासह २० वस्तूंचे भाव वाढणार; पहा काय घेणार मोदी सरकार निर्णय

चीनच्या आडमुठ्या धोरणाला वेसन घालण्यासाठी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. चीनी मोबाइल कंपन्या आणि अॅप्लिकेशन यांना बंदी घालतानाच आता सुमारे २० वस्तूंवरील आयात कर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांनतर भारतात त्या वस्तूंचे भाव त्या पटीत वाढतील.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कस्टम ड्यूटी वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे आलेला आहे. त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. चीन सोडून फ्री ट्रेड एग्रिमेंट (एफटीए)यातील व्हियेतनाम आणि थाईलंड यांच्या वस्तूंना प्राधान्य देण्यावर सरकारी यंत्रणा विचार करीत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी ही कार्यवाही केली जात आहे.

चीनच्या वस्तूंसाठी असा निर्णय झाल्यास भारतीय बाजारपेठेत चीनकडून येणाऱ्या वस्तूंचे भाव अपोआप वाढतील. त्यामध्ये लॅपटॉप, कपडे, कॅमेऱ्यासह स्टील आणि इतर सुमारे २० वस्तूंचा समावेश असणार आहे.

संपादन : सचिन पाटील

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushirang
Top