Monday, 13 Jul, 4.01 pm कृषीरंग

ताज्या बातम्या
वाढत्या बेरोजगारीतही ४० हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे 'ही' कंपनी; वाचा न शेअर करा

करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात आता अनेक उद्योगांना याचा गंभीर फटका बसला आहे. अशावेळी ऑनलाईनमध्ये फ़क़्त काही संधी टिकून आहेत. मात्र, फ़क़्त टिकायाची भाषा न करता थेट रोजगार देऊन विस्ताराची भाषा आता टीसीएस (TCS) अर्थात टाटा कंसल्टैंसी सर्विसेज यांनी केली आहे. त्यांनी थेट ४० हजार फ्रेशर्सना काम देण्याची तयारी केली आहे.

बेंगलोर स्थित कंपनीच्या मुख्यालायासह जगभरातील शाखांमध्ये नवीन संगणक अभियंत्यांना नोकरी देण्याची तयारी या कंपनीने केली आहे. अमेरिकेतही यंदा या कंपनीने २ हजार जणांना कामाची संधी दिली आहे. मात्र, अमेरिकन सरकारच्या एच-1बी आणि एल-1 वर्क व्हिसा यावरही कंपनीची काही गणिते ठरणार आहेत.

दुसऱ्या सहामाहीत ही भरती करण्याचे नियोजन आहे अशी घोषणा टीसीएसचे ईवीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड़ यांनी केली आहे. ही भरती किमान ३५ हजार लोकांची असेल किंवा कमाल ४५ हजार जणांची. याबाबत कंपनी वेळोवेळी माहिती देत राहील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Krushirang
Top