Friday, 08 Nov, 6.31 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
AUS vs PAK T20I: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 10 विकेटने नमवत 2-0 ने केला क्लीन-स्वीप

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान संघ (Photo Credit: Getty Images)

पर्थ येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि अंतिम टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) ने पाकिस्तानवर 10 विकेटने पराभूत केले. पहिले फलंदाजी करताना पाकिस्तानचा (Pakistan) संघ निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 106 धावा करू शकला. कांगारू संघाने कोणतीही विकेट न गमावतालक्ष्य 11.5 षटकांत गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजय मिळवला आणि क्लीन-स्वीप पूर्ण केला. या मालिकेपूर्वी पाकिस्तानला घरच्या मैदानावर खेळलेल्या श्रीलंकाविरुद्ध मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. कर्णधार एरोन फिंच (Aaron Finch) 52 आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) नाबाद 48 धावांवर परतले. यंदाचा ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित संस्मरणीय ठरला. ऑस्ट्रेलिया 2019 हे वर्ष एकही टी-20 सामना न गमावता संपवेल. ऑस्ट्रेलियाने आजवर 2019 मध्ये 8 टी-20 सामन्यात 7 मध्ये विजय मिळवला आहे, 1 मॅच अनिर्णित राहिली आहे. शिवाय, आयसीसीच्या अव्वल स्थानी असलेला पाकिस्तानी संघाने 2019 मधील 10 टी-20 सामन्यात फक्त 1 सामना जिंकला आहे. ( AUS vs PAK 3rd T20I: मिशेल स्टार्क याने गमावली हॅटट्रिकची संधी, शानदार चेंडूवर मोहम्मद रिजवान याला बोल्ड करत सर्वांना केले चकित, पाहा Video )

या दौऱ्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) याच्या जागी बाबर आझम (Babar Azam) याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. या मालिकेत सरफराजला संघातही स्थान मिळालेले नाही आणि त्याच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान या सामन्यात खाते न उघडता बाद झाला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद याने सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय इमाम उल हकने 14 धावा केल्या. या दोघांशिवाय कोणताही फलंदाज दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन याने तीन, तर मिशेल स्टार्क, सीन एबॉट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. एस्टन आगर याला एक विकेट मिळाली.

फिंच आणि वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांत 56 धावा करून संघाचा विजय निश्चित केला. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंका संघाचा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लिन स्वीप केला होता. स्टीव्ह स्मिथ याला मॅन ऑफ द सीरिज, तर एबॉटला सामनावीर ठरविण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>