Saturday, 14 Dec, 5.46 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
Australia Vs New Zealand Test Match: डेव्हिड वार्नर याने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम

David Warner (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलिया संघाचे तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर (David Warner) यांनी डॉन ब्रॅडमन (David Warner) यांचे विक्रम मोडीत काढले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia Vs New Zealand Test Match) यांच्यात पर्थ (Perth) येथे सुरु असलेल्या डे-नाईट सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, डेव्हिड वार्नर यांनी कसोटी करिअरमधील 7 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. डेव्हिड वार्नर यांनी 151 इनिंगमध्ये 48.65 च्या सरासरीने 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वार्नरच्या नावावर 23 शतक आणि 30 अर्धशतक आहेत. यात त्याने सर्वाधिक 335 आहे, जे गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या विरोधात केले होते.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थ येथील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, डेव्हिड वार्नरने न्यूझीलंडच्या विरोधात या सामन्यात आपल्या करिअरचे 7 हजार धावा करुन नवा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डॉन ब्रडमन यांनी 52 कसोटी सामन्यात 6 हजार 996 धावा केल्या होत्या. याशिवाय, डेव्हिड वार्नर हे 7 हजार धावा करणारे ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज ठरले आहे. तसेच माजी खेळाडू ग्रेक चॅपल यांच्या विक्रमांशी बरोबरी केली आहे. 'महेंद्र सिंह धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळणार'- ड्वेन ब्राव्हो

आयसीसीचे ट्वीट-

कसोटी सामन्यात 7 हजार धावा करणारा डेव्हिड वार्नर हा ऑस्ट्रेलियाचा 12 वा फलंदाज ठरला आहे. याआधी एलन बॉर्डर मार्क टेलर, डेव्हिड बून, ग्रेग चॅपल, स्वीव्ह वॉ, मार्क वॉ मॅथ्यू हॅडन, जस्टिन लॅंगर, रिकी पॉन्टीग, मायकल हसी, स्वीव्ह स्मिथ, यांनी 7 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top