Wednesday, 05 Aug, 10.46 am लेटेस्ट ली

राष्ट्रीय
Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी 150 कोरोनामुक्त पोलिसांची नेमणूक करण्यामागे 'हे' आहे महत्त्वाचे कारण

PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरीसह संपूर्ण देश उत्सुक आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही वेळातच अयोध्येत दाखल होतील. अयोध्येमधील साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 तास अयोध्येत असतील. त्यामुळे त्यांच्या कडक सुरक्षेसाठी (Security) 150 कोरोनामुक्त पोलिसांची निवड करण्यात आली आहे. अनेकांना प्रशन पडला आहे की, की मोदींच्या सुरक्षेसाठी कोरोनामुक्तच पोलिसांची निवड करण्यात का आली? तर त्याला कारणही तसेच आहे.

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत आगमन होईल त्यावेळी सर्वांचे लक्ष त्यांच्यासोबत असलेल्या विशेष सुरक्षा रक्षकांकडे असेल. यामध्ये यावेळी कोरोनामुक्त झालेल्या 150 स्थानिक सुरक्षारक्षकांचा समावेश आहे.

मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या पोलिसांमुळे करोनाचा फैलाव होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. पुढचे काही महिने करोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे. हे या मागचे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे 150 पोलिस 25 जुलैपर्यंत कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना अयोध्येला पाठविण्याची विनंती केली असल्याचे दिपक कुमार यांनी सांगितले यातील बहुतांश पोलिस लखनऊचे असून काहीजण रायबेरलीचे आहेत.

492 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपुष्टात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी करतील. विशेष गोष्ट म्हणजे भगवान श्री राम यांचा जन्म अभिजीत मुहूर्ता येथे झाला होता आणि त्याच मुहूर्तामध्ये आज मंदिरासाठी भूमिपूजन होणार आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर यांच्यासारखे प्रमुख नेते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमास सामील होतील. तसेच, संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल, जेणेकरून देशभरातील कोट्यावधी भक्त या ऐतिहासिक क्षणाचे साक्षी बनतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top