Thursday, 16 Jan, 2.46 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
BCCI ने जाहीर केली खेळाडूंची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट यादी; विराट कोहली-जसप्रीत बुमराह ला दरवर्षी मिळणार 7 कोटी, एमएस धोनी चे नाव गायब

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

बीसीसीआयने (BCCI) ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी क्रिकेटपटूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या चार श्रेणी देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी प्रमाणे नव्या यादीमध्ये यंदाही विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या तीनच खेळाडूंना ए+ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. 11 खेळाडू ए ग्रेड मध्ये, 5 खेळाडू बी ग्रेड मध्ये आणि 8 खेळाडू सी ग्रेड मध्ये स्थान मिळाले आहे. ए+ ग्रेडमध्ये कोहली, रोहित आणि बुमराह हे तीनही खेळाडू आहेत, संपूर्ण यादीमध्ये महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला स्थान मिळाले नाही. हा करार ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीचा आहे. धोनीच्या संघातील भविष्यावरील प्रश्न बर्‍याच काळापासून चर्चा होत आहे आणि त्याला वार्षिक करारामधून वगळण्याच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माजी कर्णधारपदाच्या संभाव्य समाप्तीकडे संकेत देत आहे.

नवीन खेळाडूंपैकी नवदीप सैनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहर यांना बीसीआयच्या वार्षिक करारात स्थान मिळाले आहे. विराट, रोहित आणि बुमराहचा ए+ यादीत समावेश झाल्याने त्यांना वार्षिक 7 करोड रुपये दिले जातील. ए + ग्रेडमध्ये आर अश्विन, केएल राहुल, रिषभ पंत भुवनेश्वर कुमार चेतेश्वर पुजारा यांच्यासह एकूण 11 खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यांना वार्षिक 5 करोड मिळतील. सर्वाधिक 11 खेळाडू ग्रेड-ए मध्ये आहेत. यामध्ये युवा खेळाडूंपैकी फक्त रिषभ पंतचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात दुखापती झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रिद्धिमान साहा याला बी ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये साहासह उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवालचा समावेश आहे.

ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 पर्यंत खेळाडूंचे ग्रेड लिस्ट

ए + ग्रेड: विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ए ग्रेड: आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहूल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि रिषभ पंत

बी ग्रेड: रिद्धिमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल

सी ग्रेड: केदार, जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top