Friday, 27 Mar, 9.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
Corona Kavach: आता 'कोरोना कवच' App द्वारे समजणार आपल्या आजूबाजूच्या Coronavirus संक्रमित व्यक्तींची माहिती; जाणून घ्या सविस्तर

Corona Kavach App (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच 17 मृत्यू आणि 67 रूग्ण बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या साथीच्या रोगातून मुक्त होण्यासाठी देश धडपडत आहे. अशात आता कोरोना व्हायरसचा ट्रॅक ठेवण्यासाठी, सरकारने इंग्रजी व अन्य प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये, 'कोरोना कवच' (Corona Kavach) अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक कोरोना संक्रमित रूग्णांच्या संपर्कात आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी या अ‍ॅपची मदत होणार आहे.

मोदी सरकारने या मोबाइल अॅप्लिकेशनचे नाव अतिशय समर्पक, 'कोरोना कवच' असे ठेवले आहे. या अॅपद्वारे आपण कोणत्या कोरोना पेमेंटच्या संपर्कात आला आहात की नाही हे जाणून घेण्यास मदत होणार आहे. सध्या हे अॅप मोबाइल स्मार्टफोनच्या अँड्रॉइड आवृत्तीसाठी तयार आहे परंतु Apple वापरकर्त्यांसाठी अद्याप यावर काम सुरु आहे. हे अॅप इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि नीती आयोग यांनी तयार केले असून, लवकरच ते वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

असे करू शकता वापर -

या अ‍ॅपमध्ये आपल्याला आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि ओटीपीसह लॉग इन करावे लागेल. त्यानंतर आपण परवानगी दिल्यावर आपण होम स्क्रीनवर पोहोचाल. या स्क्रीनवर आपण देशातील एकूण कोरोना प्रकरणे, बरे झालेले रुग्ण, एकूण मृत्यू आणि कोरोनाची एकूणच माहिती पाहू शकाल. महत्वाचे म्हणजे आपण एखाद्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यास, त्याची माहितीही हे अ‍ॅप आपणास देईल. आपल्या फोनच्या लोकेशनद्वारे ही मीहिती प्राप्त होईल. ( रेल्वेमध्ये तयार होणार कोरोना ग्रस्तांसाठी हॉस्पिटल; एसी कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय)

या अ‍ॅपमध्ये तीन कोड आहेत- हिरवा, पिवळा आणि लाल अशा रंगाचे. त्यातील हिरव्या कोडचा अर्थ आहे की आपण पूर्णपणे सुरक्षित आहात. पिवळा कोड म्हणजे आपण संक्रमित कोरोना रुग्णाशी संपर्कात आला आहात व लाल कोडचा अर्थ आहे की आपणास कोरोना संक्रमण झाले आहे. तर अशा प्रकारे या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोरोना संक्रमित रुग्णांचा मागोवा घेऊ शकाल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top