Thursday, 14 Oct, 12.16 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
CSK vs KKR IPL 2021 Final: चेन्नई सुपर किंग्सने 5 आयपीएल फायनलमध्ये चाखली आहे पराभवाची धूळ, एमएस धोनीसमोर कठीण आव्हान

एमएस धोनी आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएल (IPL) 2021 चा फायनल 'महामुकाबला' रंगणार आहे. आयपीएल 2021 मधील 59 सामन्यांनंतर जेतेपदाच्या लढतीत जाणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. एका बाजूला 3 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आहे तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स ज्यांनी दोन वेळा IPL विजेतेपदाचा आस्वाद घेतला आहे. एमएस धोनीचे सुपर किंग्स जे गेल्या मोसमात सातव्या स्थानावर होते त्यांनी यंदा पहिले फायनलमध्ये प्रवेश केला. पण कोलकातासाठी अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता कठीण होता. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात विजयासह सुरुवात करणारा कोलकाता संघाची गाडी रुळावरून उतरली. मात्र, शेवटच्या 4 सामन्यांमध्ये इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) रायडर्सने दमदार खेळ दाखवत सर्व सामने जिंकले आणि तिसऱ्यांदा आयपीएल फायनलचे तिकीट मिळवले. दुसरीकडे, सीएसकेने (CSK) आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले असले तरी संघाचा अंतिम रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. ( IPL 2021: 'या' खेळाडूने बदलले कोलकाताचे भाग्य, भारतात 7 पैकी दोन सामने जिंकणाऱ्या नाईट रायडर्सची UAE त फायनलमध्ये धडक )

यंदाच्या 14 व्या हंगामापूर्वी धोनीच्या सुपर किंग्सने विक्रमी 8 वेळा अंतिम फेरी खेळली आहे. पण त्याला रेकॉर्ड पाच वेळा पराभवाची धूळ चारायला लागली आहे. अशा स्थितीत धोनीसमोर कठीण आव्हान आहे. जेव्हा चेन्नईचा संघ या शुक्रवारी कोलकाताविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी जाईल, तेव्हा ही गोष्ट नक्कीच त्यांच्या मनात असेल. दुसरीकडे, केकेआरच्या फायनलचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. आयपीएल 2021 पूर्वी संघाने 2 वेळा अंतिम फेरी गाठली आहे आणि दोन्ही वेळा जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2014 मध्ये KKR किंग्ज इलेव्हन पंजाबला (आता पंजाब किंग्ज) पराभूत करून IPL चा चॅम्पियन बनला. तसेच याच्या 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2012 मध्येही केकेआर आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला होता. विशेष म्हणजे तेव्हा नाईट रायडर्सने धोनीच्या चेन्नईचा अंतिम षटकात पराभव केला होता. ही वस्तुस्थिती धोनीची चिंता वाढवण्यासाठी पुरेशी आहे. याशिवाय आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सलग 4 सामने जिंकून ज्या प्रकारे संघाने अंतिम तिकीट बुक केले आहे, त्यानेही धोनी 'ब्रिगेड'साठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

आयपीएल 2021 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने 8 फायनल सामने खेळला असून त्यापैकी त्यांना पाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्या 5 प्रसंगी कोणत्या संघाने त्याला पराभूत केले ते जाणून घ्या.

2008- आयपीएलच्या पहिल्या सत्रातही चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत पोहोचली. पण त्याला राजस्थान रॉयल्सने हरवले आणि जेतेपद पटकावले.

2012- चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव करून केकेआरने जेतेपद पटकावले.

2013- आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्जवर मात केली होती.

2015- आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला

2019- चेन्नई सुपर किंग्जचा मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत 1 धावेने पराभव केला.

Related Videos" showVideoTitle="true">

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top