Saturday, 14 Dec, 11.01 am लेटेस्ट ली

राष्ट्रीय
दिल्ली: भारत बचाओ रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस करणार रामलीला मैदानात जोरदार आंदोलन

काँग्रेस पक्षाचे दिल्लीत आंदोलन (Photo Credits-ANI)

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पक्षाची आज दिल्लीतील (Delhi) रामलीला मैदानात 'भारत बचाओ' (Bharat Bachao) रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे मुख्य उद्देश हे भाजप सरकारच्या विरोधात मोदी है तो मंदी अशी घोषणाबाजी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना टी-शर्ट्स सुद्धा वाटण्यात आल्या आहेत. या रॅलीमध्ये राहुल गांधी ही उपस्थिती लावणार आहेत.

मोदी सरकारच्या विरोधात आयोजिक केलेल्या या आंदोलनाची सुरुवात 12 वाजता होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदश्रेष्ठींसह अन्य वरिष्ठ नेते मंडळी ही उपस्थिती लावणार आहेत. तर पक्षाचे कार्यकारिणी सदस्य 11.15 वाजताच्या सुमारास रामलीला मैदानात येणारआहेत. या आंदोलनासाठी भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे. पक्षाचे बॅनर्स, पोस्टरसह झेंडे सुद्धा रस्त्याला आणि मैदानात चहूबाजूंनी झळकवले आहेत.

ANI Tweet:

भारत बचाओ या आंदोलनासाठी उत्तर प्रदेशातून जवळजवळ 49 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते दिल्लीत येत आहेत. या आंदोलनापूर्वी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटेल आहे की, आज दिल्लीच्या ऐतिहासिक अशा रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारची हुकूमशाही मध्ये मारली गेलेली अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या विरोधात निषेध सभेत केला जाणार आहे.(भाजप महिला खासदारांच्या मागणीला राहुल गांधी यांचा नकार; माफी मागणार नसल्याचे केले स्पष्ट)

Rahul Gandhi's Tweet:

तर राज्यात सुरु असलेली आर्थिक मंदी, शेती आणि बेरोजगारी सारख्या अन्य प्रमुख मुद्द्यांवरुन भाजप सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली जाणार आहेत. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुद्धा भाजपवर काँग्रेस पक्षाकडून हल्ला केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या रॅलीत काँग्रेस काय भुमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top