Friday, 13 Dec, 3.16 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
ड्वेन ब्राव्हो याचे निवृत्तीमधून यू-टर्न; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे केले जाहीर

ड्वेन ब्राव्हो (Photo: Getty Images)

अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याने वेस्ट इंडीज (West Indies) क्रिकेट बोर्डाशी झालेल्या मतभेदामुळे घेतलेल्या निवृत्तीतून शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली. ब्राव्हो म्हणाला की वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाची (West Indies Cricket Board) सत्ता बदलल्यामुळे आपले मत बदलले आहे. टीमचे माजी मॅनेजर रिकी स्कर्ट यांची आता डेव्ह कॅमेरून यांच्या जागी मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रावोने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ब्राव्होने निवेदनात म्हटले आहे की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्याची मी घोषणा करतो. प्रशासकीय सुधारणानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतला यात काही शंका नाही. टी-20 क्रिकेटमध्ये निवड करण्यासाठी मी उपलब्ध असल्याचे मला निवडकर्त्यांना सांगायचे आहे." ब्राव्होचा कॅमेरूनशी विवाद झाला होता, ज्याच्यवर त्याने कारकीर्द नष्ट केल्याचा आरोप केला होता.

2014 मध्ये जेव्हा ब्राव्होच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने बोर्डाच्या देयकाच्या वादामुळे भारत दौरा अपूर्ण सोडून परतले होते. गेल्या महिन्यात निवृत्तीवरून परतू आणि वेस्ट इंडिजकडून पुन्हा खेळेल असे संकेत ब्राव्होने दिले होते. ब्राव्होने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे वेस्ट इंडिजला अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 ने विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करताना सांगितले.

ब्राव्होने वेस्ट इंडिजकडून 40 कसोटी, 164 वनडे आणि 66 टी-20 सामने खेळले. तो चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळतो. याशिवाय पीएसएल, बिग बॅश लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग, कॅनडा लीग आणि अबू धाबी टी-10 लीगही खेळले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top