Friday, 20 Mar, 11.10 am लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
Flipkart Big Shopping Days Sale 2020 मध्ये Smartphone, AC, Laptop सह 'या' वस्तूंवर बंपर ऑफर्स

Flipkart Big Shopping Days Sale (Photo Credits: Flipkart Official Site)

Flipkart Big Shopping Days Sale 2020 ला सुरुवात झाली आहे. बुधवार, 18 मार्च पासून Flipkart Plus Members साठी हा सेल सुरु झाला आहे. आता मात्र हा सेल सर्व युजर्ससाठी खुला आहे. हा सेल 22 मार्च पर्यंत सुरु राहणार असून या अंतर्गत अनेक वस्तूंवर भरगोस सूट मिळत आहे. Smartphones सह घरगुती उपकरणे, लॅपटॉप, बेबी प्रॉडक्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू यावर डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. तसंच या सेलअंतर्गत खरेदी करताना SBI चे कार्ड वापरल्यास तुम्हाला 10% पर्यंत कॅशबॅकचा लाभ घेता येईल. तर जाणून घेऊया सेलअंतर्गत मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल.... (Gudi Padwa 2020 Samsung Offers: यंदा गुढी पाडव्याला खरेदी करा सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अन् मिळवा 15 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक)

स्मार्टफोन्स

Flipkart Big Shopping Days Sale मध्ये स्मार्टफोन्सवर विविध डिल्स मिळत आहेत. काही स्मार्टफोन्सवर एक्स्ट्रा एक्सचेंज बेनफिट दिले जात आहे. तर SBI Card ने पेमेंट केल्यास 10% डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे या सेलमध्ये Realme 5 हा स्मार्टफोन तुम्ही 8,499 रुपयांना तर Samsung Galaxy S9 हा फोन 21,999 रुपयांना खरेदी करु शकाल. त्याचबरोबर Realme 5 Pro ची किंमत या सेलमध्ये 11,999 रुपये आहे. तर Vivo Z1 Pro हा सेल फोन 11,999 रुपयांना उपलब्ध आहे.

घरगुती उपकरणे

या सेलमध्ये TV आणि घरगुती उपकरणांवर 75% डिस्काऊंट दिले जात आहे. सेलमध्ये Smart TV ची किंमत 4,999 रुपयांपासून सुरु होत आहे. तर फुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स केवळ 9,499 रुपयांपासून उपलब्ध आहेत. AC केवळ 19,999 रुपयांपासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर फ्रिज आणि मायक्रोव्हेव अनुक्रमे 5,999 आणि 1,899 रुपयांपासून खरेदी करु शकाल.

Electronics आणि Accessories

Electronics आणि Accessories वर 80% डिस्काऊंट मिळत आहे. यात गेमिंग लॅपटॉप्सची किंमत 44,990 रुपयांपासून सुरु होत आहे. तर हेडफोन्स आणि स्पीकर्सवर 70% सूट दिली जात आहे. याशिवाय प्रिंटर, साऊंड बार्स आणि मेन्स ग्रुमिंगवर देखील डिस्काऊंट ऑफर्स दिल्या जात आहेत. लॅपटॉप आणि डेक्सटॉपवर 40% डिस्काऊंट मिळत आहे. मोबाईल एक्सेसरीज आणि कव्हर्सवर देखील 80% सूट दिली जात आहे.

फॅशन प्रॉडक्ट्स

फॅशन प्रॉडक्ट्सवर 50-80% डिस्काऊंट दिले जात आहे. यात महिला आणि पुरुष या दोघांच्याही प्रॉडक्ट्सचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर घडाळ्यांवर 80% सूट दिली जात आहे. शूजवर 40-80% डिस्काऊंट मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून तुम्हीही या काळात घरी असाल. तर वेळ घालवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग हा एक मस्त पर्याय आहे. ऑनलाईन शॉपिंग करुन तुम्ही या सेलमध्ये मिळाणाऱ्या ऑफर्सचा लाभ नक्कीच लाभ घेऊ शकता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top