Sunday, 20 Sep, 1.02 pm लेटेस्ट ली

मनोरंजन
Hasee Toh Phasee सिनेमात सुशांत सिंह राजपूत सोबत काम करण्यास परिणीती चोप्रा हिने दिला होता नकार; अनुराग कश्यप याने सांगितले कारण

Parineeti Chopra and Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

शुद्ध देसी रोमांस या सिनेमात परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु, त्यापूर्वी परिणीती चोप्रा ने 'हंसी तो फंसी' (Hasee Toh Phasee) सिनेमात सुशांत सह काम करण्यास नकार दिला होता. यामागील कारणाचा खुलासा फिल्ममेकर अनुराग कश्यप याने केला आहे. एका मुलाखतीत अनुराग कश्यप याने सांगितले की, "हंसी तो फंसी सिनेमासाठी सुशांत सिंह राजपूत याला साईन करण्याचा विचार होता. त्यासंदर्भात सुशांतशी बोलणे देखील झाले होते. परंतु, त्यानंतर त्याने यशराज बॅनरखाली 3 सिनेमे करण्याचा करार केला. त्यानंतर या सिनेमातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा ही जोडी पडद्यावर झळकली."

या सिनेमासाठी परिणीती चोप्रा हिला विचारले असता सुशांत सिनेमात असल्यामुळे तिने नकार दिला. परीणीती सुशांतसोबत काम करु इच्छित नव्हती. कारण सुशांत एक टीव्ही अभिनेता होता. मात्र सुशांत केवळ टीव्ही अभिनेता नसून त्याने का पो छे आणि पीके सिनेमात देखील काम केले आहे, असे अनुराग कश्यपने तिला सांगितले. त्यानंतर परिणीतीने यशराज फिल्मच्या शुद्ध देसी रोमान्स सिनेमासाठी सुशांतचे नाव सुचवले.

तसंच सुशांत सिंह राजपूत बद्दल काहीही प्रॉब्लेम नसल्याचे अनुराग याने स्पष्ट केले. खरंतर तो एक चांगला मुलगा आहे, असेच सर्व लोक म्हणत असतं, असेही कश्यपने सांगितले.

दरम्यान, तेलुगु अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर लैगिंक शोषणाचा आरोप केला आहे. त्यावर कंगनाने देखील तिला पाठींबा दर्शवला आहे. मात्र यावर अनुराग याने मौन सोडले असून त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच मी अशाप्रकराचे वर्तन कधीच करत नाही आणि केलेले सहनही करत नाही, अशा प्रकारे अनुराग याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी अभिनेत्रीने लैंगिक शोषणाच्या आरोपाची लेखी तक्रार द्यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून कायदेशीर कारवाई करता येईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top