Saturday, 16 Nov, 9.46 am लेटेस्ट ली

क्रीड़ा
IND vs BAN 1st Test: हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकारने विचारलेल्या प्रश्नाला मयंक अग्रवाल याने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही होईल हसू अनावर, पाहा Video

मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty Images)

बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताने सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या 243 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 493 धावा करत पहिल्या डावात 343 धावांची आघाडी मिळविली आहे. मयंकने 330 चेंडूत 28 चौकार आणि आठ षटकारांसह शानदार डाव खेळला. बांग्लादेशविरुद्ध दुसर्‍या दिवशी मयंकने खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात दुसऱ्यांदा दुहेरी शतकाची नोंद केली. पण, मयंकने ज्याप्रकारे शानदार फलंदाजी करून दुहेरी शतक पूर्ण केले ते पाहून असे वाटले की तो तिहेरी शतकी खेळी करू शकेल. त्याच्या या कामगिरीबद्दल प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याने कौतुक केले शिवाय, विरोधी खेळाडूंनीही हस्तांदोलन करत त्याला शुभेच्छा दिल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 6 बाद493 धावा केल्या होत्या. यानंतर दिवसाचा खेळ संपल्यावर तो काय करतो याबद्दल मयंकला पत्रकारांनी विचारले. ( IND vs BAN 1st Test Day 2: मयंक अग्रवाल याने षटकार मारत ठोकले दुसरे दुहेरी टेस्ट शतक )

"अशाच एका दिवशी तू हॉटेलमध्ये संध्याकाळी परतल्यावर काय करतो? तू आपल्या डावाची ठळक वैशिष्ट्ये पाहतो का? किंवा आपल्याला एखादा चित्रपट पाहणे आवडते? किंवा नेटफ्लिक्स शो? आपण काय करता? मयंक काय करतो?, असे पत्रकारने विचारले. यावर मयंकचे मजेशीर अंदाजात उत्तर दिले की तिथे उपस्थित सर्व पत्रकारांना आणि खुद्द मयंकला हसू अनावर झाले. उत्तरात देताना मयंक हसला आणि म्हणाला: "मयंक पबजी खेळतो." मयंकचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच हसू फुटले. पहा हा व्हिडिओ:

दुसर्‍या दिवशी भारताने 343 धावांची आघाडी मिळाली होती. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात बांग्लादेशला बॅकफूटवर ढकलत पुनरागमन केले आणि मोठी आघाडी मिळवली. दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 54 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि 2 चेंडूंचा सामना करत शून्यावर माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 86 धावा करुन बाद झाला. रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला क्रीजवर जास्त वेळ घालवता आला नाही आणि त्याला 12 धावा करत इबादत हुसेन याने त्याला बोल्ड केले. मात्र, नंतर उमेश यादव आणि रवींद्र जडेजा याने संघाचा डाव सांभाळला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>