Friday, 11 Oct, 4.16 am लेटेस्ट ली

क्रीड़ा
IND vs SA 2nd Test Day 2: विराट कोहली याच्यासमोर आफ्रिकी गोलंदाज निरुत्तर, टीम इंडियाने पहिला डाव 601/5 धावांवर केला घोषित

(Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या तुफानी खेळीच्या जोरावर संघाने दक्षिण आफ्रिका पहिला डाव 5 बाद 601 धावनावर घोषित केला. विराटने 254 धावांची खेळी करत टेस्ट कारकिर्दीतील सर्वात चांगल्या धावसंख्येचा नोंद केली. विराटशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा याने देखील शानदार फलंदाजी केली आणि 91 धावांवर नाबाद राहिला. दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने तीन विकेट गमावून 273 धावा केल्या. कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याला तिन्ही यश मिळाले. पहिल्याच दिवशी मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने शानदार 108 धावा फटकावल्या होत्या. कोहलीच्या शतकी खेळीने भारतीय संघाला दुसऱ्या टेस्टमध्ये मजबूत स्थितीत पोहचले. डीन एल्गार याच्या चौथ्या चेंडूवर कोहलीने कारकीर्दीत प्रथमच 250 धावा पूर्ण केल्या. ( IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विराट कोहली याचे रेकॉर्ड 7 वे दुहेरी शतक, डॉन ब्रॅडमन देखील राहिले मागे )

दरम्यान, दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी मयंक अग्रवाल याने 195 चेंडूत 108 धावा केल्या आणि कगिसो रबाडाच्या चेंडूवर माघारी परतला. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 215 धावा केल्या होत्या. विराटने अजिंक्य रहाणे याच्यासह शतकी भागीदारी केली. आणि नंतर जडेजासह द्विशतकी भागीदारी केली. भारताने 600 धावांचा मोठा स्कोर करत आफ्रिकी संघ नक्कीच दडपणाखाली आला आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे खेळपट्टी अजूनही फलंदाजांना साथ देत आहे. विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 7 वे दुहेरी शतक झळकावले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावाही पूर्ण केल्या. विशेष म्हणजे कोहलीने कर्णधार म्हणून आपली सातही डबल शतके ठोकली आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक दुहेरी शतक ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वल क्रमांकावर आहे.

दुसऱ्या टेस्टमंडे आफ्रिकेसाठी कगिसो रबाडा याने पहिले तीन विकेट घेत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला पण, मयंक, पुजारा आणि विराट यांनी दमदार फलंदाजी केली. विशेषतः विराटने दुहेरी शतक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. यात, सचिन तेंडुलकर, स्टिव्ह स्मिथ यांच्यासह डॉन ब्रॅडमन याचादेखील समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top