Sunday, 13 Oct, 8.46 am लेटेस्ट ली

क्रीड़ा
India vs South Africa 2nd Test Day 4 Updates: भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळवत जिंकली मालिका

SA 189 in 67.2 Overs | टीम इंडियाने पुणे कसोटी सामना डाव आणि 137 धावांनी जिंकला, रचला इतिहास 13 Oct, 15:10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत चौथ्या दिवशी विजय मिळवला. पुणे कसोटी जिंकल्यानंतर भारताने इतिहास रचून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळताना हा भारताचा सलग 11 वा कसोटी मालिका विजय आहे. या प्रकरणात भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

SA 189/9 in 67 Overs | उमेश यादवने दिला दक्षिण आफ्रिकेला नववा झटका, कगिसो रबाडा आऊट 13 Oct, 15:00

उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेला नववा झटका दिला. कगिसो रबाडा 4 धावांवर बाद.

SA 185/8 in 66.1 Overs | दक्षिण आफ्रिकेला 8 वे धक्का 13 Oct, 14:57

टी-ब्रेकनंतर खेळ सुरू झाला आहे. वेर्नोन फिलँडर याच्या रूपात दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का बसला. 66.1 षटकांत रिद्धिमान साहाने उमेश यादवच्या गोलंदाजीवर फिलांडरचा झेल पकडला. फिलँडर 72 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 37 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. नवीन फलंदाज कागिसो रबाडा दाखल झाला आहे. भारत आता विजयापासून अवघ्या दोन विकेट दूर आहे.

SA 172/7 in 61 Overs | Tea पर्यंत दक्षिण आफ्रिकाचे 7 गडी बाद 13 Oct, 14:19

दक्षिण आफ्रिकेच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. विजयापासून भारत अवघ्या तीन विकेट दूर आहे. चहा च्या वेळेपर्यंत वेर्नोन फिलँडर आणि केशव महाराज अनुक्रमे नाबाद 29 आणि 17 धावांवर खेळत आहेत.

SA 129/7 in 44.5 Overs | टीम इंडिया विजयाच्या जवळ 13 Oct, 14:14

भारत विजयाच्या जवळ येताच मोहम्मद शमीने 45 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा याच्या जोरावर सेनुरन मुथुस्वामीला झेलबाद करून त्याचा डाव संपुष्टात आणला. त्याने 44 चेंडूत नऊ धावा केल्या. भारत आता विजयापासून अवघ्या तीन विकेट दूर आहे.

SA 129/7 in 44.5 Overs | शमीने आफ्रिकेला दिला सातवा धक्का, विजयापासून भारत 3 विकेट दूर 13 Oct, 13:26

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने भारताला विजयाच्या जवळ आणले आहे. त्याने सेनुरन मुथुस्वामीला 9 धावांवर बाद करून दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. आफ्रिकी संघ अजून 183 धावांनी पिछाडीवर आहे.

SA 125/6 in 43.2 Overs | टीम इंडिया विजयाच्या वाटेवर, टेंबा बावुमा आऊट 13 Oct, 13:11

रवींद्र जडेजाच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर टेंबा बावुमाच्या बॅटच्या कडेला बॉल लागून स्लिपवर उभा असलेल्या अजिंक्य रहाणे याने सुंदर कॅच पकडला. आणि डोकादायक दिसणाऱ्या बावुमाला माघारी धाडले. बावुमा 38 धावांवर बाद झाला.

SA 79/5 in 28.2 Overs | Lunch नंतर क्विंटन डी कॉक बाद, भारत विजयापासून 5 विकेट दूर 13 Oct, 12:21

लंचनंतर दुसर्‍या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाने भारताला विकेट मिळवून दिली. त्याने विकेटकीपर क्विंटन डी कॉकला बोल्ड केले. दक्षिण आफ्रिकेने पाच विकेट गमावल्या आहेत.

SA 74/4 in 27 Overs | Lunch पर्यंत टीम इंडिया मजबूत स्थितीत 13 Oct, 11:42

दुसर्‍या टेस्टच्या चौथ्या दिवशी लंच टाइम झाला आहे. या सत्रात भारताने दक्षिण आफ्रिकेची चार महत्त्वपूर्ण विकेट मिळविल्या आहेत. भारत विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे.

SA 71/4 in 25.2 Overs | भारताला चौथे यश, डीन एल्गरचे अर्धशतक हुकले 13 Oct, 11:31

अश्विन गोलंदाजीवर आला आणि डीन एल्गारला बाद केले. 25 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर एल्गरने मिडऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण परंतु तिथे उभा असलेल्या उमेश यादवने झेल टिपला. डीन एल्गर 72 चेंडूत 48 धावांवर बाद झाला. विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक क्रीजवर आला आहे.

Load More

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपण्याआधी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांनी संपुष्टात आला. आणि भारताला 326 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून आर अश्विन (R Ashwin) याने चार, तर उमेश यादव (Umesh Yadav) याने तीन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज (Keshav Maharaj) याने सर्वाधिक 72 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसीने (Faf du Plessis) 64 धावा केल्या तर वर्नोन फिलेंडर नाबाद 44 धावा करून परतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 326 धावांची आघाडी असून टीम इंडिया फॉलोऑन देते की नाही याचा निर्णय आज घेण्यात येईल. यापूर्वी टीम इंडियाने त्यांचा पहिला डाव 601 धावांवर घोषित केला होता. केशव महाराज आणि वर्नोन फिलेंडर यांनी 109 धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना परेशान केले.

सकाळच्या सत्रातील मोहम्मद शमी याची शानदार गोलंदाजी आणि रिद्धिमान साहा याचा अप्रतिम झेल आकर्षणाचे केंद्र राहिले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीस आणि क्विनटोन डिकाक हे डाव साकारण्याचा प्रयत्न करीत होते. दोघांची 75 धावांची भागीदारी अश्विनने डी कॉकला बाद करून मोडली. सकाळच्या सत्रात शमीने 10 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन दोन गडी बाद केले तर उमेशने आठ ओव्हरमध्ये 27 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फलंदाजांना उपयुक्त ठरलेल्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top