Wednesday, 15 Sep, 4.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
iPhone 13 Effect: Apple च्या iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 11 किंमतीमध्ये नव्या आयफोन घोषणेनंतर घट; पहा भारतातील नव्या किंमती

Apple iPhone 12 Mini (Photo Credits: Apple)

Apple कडून नुकताच आयफोन 13 (iPhone 13) लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये आयफोन सोबतच अ‍ॅपलने त्यांच्या कॅलिफोर्नियामधील अ‍ॅपल इव्हेंट मध्ये Series 7, New iPad आणि iPad Mini लॉन्च केला आहे. आयफोन 13 ची घोषणा होताच आता आयफोन 12 च्या किंमतीमध्ये घट करण्यात आली आहे. आयफोन 11 देखील 64GB आणि 128GB व्हेरिरंट पाच हजार रूपयांनी स्वस्त झाला आहे. आयफोन 12 आता 14 हजार रूपयांनी स्वस्त झाला आहे तर आयफोन मिनी 10 हजार रूपयांनी स्वस्त झाला आहे.

नव्या आयफोनची घोषणा होताच भारतामध्ये अ‍ॅपल इंडियाच्या वेबसाईट वर iPhone 11, iPhone 12 Mini and iPhone 12 च्या नव्या किंमती प्रसिद्ध झाल्या आहेत. पण फ्लिपकार्टवर त्या अद्याप दिसत नाहीत. ई कॉमर्स कंपनींकडूनही त्यामध्ये लवकरच बदल प्रसिद्ध केले जाऊ शकतात.

अ‍ॅपल कडून iPhone 12 Pro आणि Pro Max यांच्या किंमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. Apple Event 2021: ॲपलचा मेगा इव्हेंट; iPad, iPad Mini, Apple Series 7 सह बहुप्रतीक्षित iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max लाँच.

iPhone 12 च्या नव्या किंमती

iPhone 12 mini 64GB - Rs 59,900

iPhone 12 mini 128GB - Rs 64,900

iPhone 12 mini 256GB - Rs 74,900

iPhone 12 64GB - Rs 65,900

iPhone 12 128GB - Rs 70,900

iPhone 12 256GB - Rs 80,900

iPhone 11 च्या नव्या किंमती

iPhone 11 64GB - Rs 49,900

iPhone 11 128GB - Rs 54,900

iPhone 13 मध्ये आता अ‍ॅपल कडून लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट हार्डवेअर, सॉफ्टवेअर फीचर्स असले तरीही आयफोन 12 हा वर्षभरानंतरही कमाल फोन आहे. आयफोन 12 मधील हार्डवेअर ऑटोमॅच होणार आहे. आयफोन 12 चा सगळयात मोठा फायदा म्हणजे त्याचं सॉफ्टवेअर अपडेट किमान 5 वर्ष होणार आहे. त्यामुळे दरवर्षी नव्या iOS version सोबत तुमचा फोन नवा होईल.

Related Videos" showVideoTitle="true">

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top