Saturday, 14 Dec, 9.10 pm लेटेस्ट ली

होम
'केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही' काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

Devendra Fadnavis And Rahul Gandhi (Photo Credit: IANS and PTI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानतंर देशाभरातून संतप्त प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. दिल्ली येथील भारत बचाव रॅलीत राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचे नावाचा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. यामुळे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागवी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. तसेच केवळ अडनाव गांधी असल्याने कोणी महात्मा होत नाही, असे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणी राहुल गांधी यांनी मेक ईन इंडियाच्या जागी रेप ईन इंडिया असे वक्तव्य काढले होते. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, असे भाजपच्या महिला खासदारांनी शुक्रवारी केली होती. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे अयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शाब्दिक हल्ला चढवला आहे. "काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !" काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत भडकले; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

तसेच, भाजप नेते गिरीराज सिंह यांनीही राहुल गांधीच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. गिरीराज सिंह म्हणाले की, राहुल गांधींनी जगाच्या पुढे भारताची बदनामी केली आहे. भारतासाठी पाकिस्तान आणि राहुल गांधी यांच्यात काहीच फरक नाही. राहुल गांधींची कृती देशविरोधी आहेत. राहुल गांधी स्वत: ची तुलना वीर सावरकरांशी करू शकत नाहीत कारण ते देशभक्त होते

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top