Tuesday, 24 Mar, 5.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
खुशखबर! Vodafone-Idea ने 'Work From Home' करणा-यांसाठी आणले '3' नवे भन्नाट प्लान्स ज्यात दिवसा मिळेल 3GB डेटा

Vodafone Idea company (PC - Wikimedia Commons )

Coronavirus च्या पार्श्वभूमिवर सरकारने कर्मचा-यांना 'Work From Home' करण्याची मुभा दिली आहे. कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस हा गर्दीत पसरतो. त्यामुळे शक्य असेल तितक्या लोकांनी काम करावे असा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे बरेच कर्मचारी या सुविधेचा लाभ घेत घरून ऑफिसचे काम करत आहे. मात्र घरचा इंटरनेट स्पीड हा ऑफिसच्या स्पीडच्या तुलनेत कमी असल्याने लॅपटॉप अथवा संगणकावर काम करताना अनेक अडथळे येत आहेत. या सर्वाचा विचार करुन जिओ, एअरटेल (Airtel) पाठोपाठ आता व्होडाफोननेही (Vodafone) आपल्या ग्राहकांसाठी वर्क फ्रॉम होम साठी 3 भन्नाट प्लान्स आणले आहेत.

249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस, 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवस आणि 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा वापरण्यास मिळेल. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळत होता. तसेच दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेता येईल.

याआधी रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केला होता. घरी बसून काम करणाऱ्या युजर्ससाठी रिलायन्स जिओने खास प्लॅन सादर करुन खुशखबर दिली आहे. 251 रुपयांचा हा प्लॅन असून याला 'Work From Home Pack' असे नाव देण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top