Friday, 01 Jan, 5.31 pm लेटेस्ट ली

व्हायरल
New Year Celebration 2021: जम्मू-काश्मीर च्या पूंछ भागात तैनात असलेल्या BSF जवानांनी अनोख्या पद्धतीने केले नववर्षाचे स्वागत, Watch Video

BSF New Year Celebration (Photo Credits: ANI/Twitter)

यंदा सर्वांनी आपापल्या परीने अगदी साधेपणाने तर काही ठिकाणी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. मात्र त्यांचा हा दिवस चांगला जावा म्हणून देशाच्या सीमेवर 24 तास तैनात असलेल्या जवानांसाठी थर्टी फर्स्ट साजरा करणे जरा अवघडच! आपल्या पैकी अनेक जण कुटूंबासोबत, मित्रपरिवारासोबत हा दिवस साजरा करत आहे. मात्र भारतीय जवान या सर्वांपासून दूर आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मानणे ही गोष्ट त्यांनी आपल्या गाठी बांधली आहे. म्हणूनच जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पूंछ (Poonch) भागात तैनात असलेल्या BSF जवानांनी अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले.

हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील आहेत. येथे तैनात असलेले BSF जवान एकत्र होऊन पंजाबी गाण्यावर छान नाच करताना दिसत आहे. या नृत्यात त्यांचा चेह-यावर आनंद मन प्रसन्न करणारा आहे.

देशातील प्रत्येक जण आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत करत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबई पोलिसांसह नववर्षाचे स्वागत केले. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही 2021 या नववर्षाचे स्वागत महाराष्ट्र पोलिसांसोबत साजरे केले. त्यासाठी अनिल देशमुख पुणे पोलीस नियंत्रण कक्ष विभागात गेले. या वेळी देशमुख यांनी स्वत: नागरिकांच्या तक्रारींचे फोन कॉल स्वीकारले आणि पुणेकरांना एक सुखद धक्का दिला 'हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय' हा आवाज ऐकून काही काळ पुणेकरांनाही आपल्या कानावर विश्वास बसला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top