Wednesday, 16 Oct, 10.31 am लेटेस्ट ली

क्रीड़ा
पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद झाला खजील; पत्रकार परिषदेत मान खाली घातली, पहा Video

युवराज सिंह, बेन कटिंग आणि एरिन हॉलेंड (Photo Credit: GT20 Canada/Twitter)

आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान (Pakistan) संघाचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) आणि अन्य क्रिकेटपटुंवर चाहते आणि विशेषज्ञाकडून कसून टीका केली जात आहे. 2009 मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा पाक दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध टी-20 मालिकेत झालेल्या पराभवानंतर चाहते निराश झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंबरोबरच तिथले मीडियाही कर्णधार सरफराजवर हल्ला करत आहे. नुकतीच अशीच एक बाब समोर आली आहे ज्यामध्ये सरफराजचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला होता. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज सध्या पाकिस्तानच्या डोमेस्टिक टी-20 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सरफराज सिंध संघात आहे. विशेष म्हणजे तो या संघाचा कर्णधार नाही, तर विकेटकीपर म्हणून संघाचा एक भाग आहे. सरफराज सामन्यानंतर पत्रकार परिषदेत पोहोचला जिथे एका पत्रकाराने त्याला असा प्रश्न विचारला की त्याला लज्जास्पदपणे मान खाली घालावी लागली. ( श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवानंतर पाकिस्तानात हंगाम, सफराझ अहमद याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव )

पत्रकाराने सरफराजला विचारले की, 'श्रीलंकाविरुद्ध संघाच्या पराभवाने संपूर्ण पाकिस्तान दु:खी आहे. अशा खराब कामगिरीनंतर भविष्यात तुमचे सामने कोण पाहायला येईल? पत्रकारांच्या या प्रश्नानंतर सरफराजने हसत-हसत मान खाली घातली. दरम्यान, विशेषतः ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्याला तातडीने अधिकाऱ्यांनी शांत केले आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर फैसलाबाद स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. एवढेच नव्हे तर तो पत्रकार राष्ट्रीय टी-20 कपचे कव्हरेजही करू शकणार नाही.

यंदाच्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकनंतर सरफराजवर दबाव कायम आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध सामन्यादरम्यान सरफराज कंटाळलेला दिसला ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, आता त्याने युवा श्रीलंका संघाविरुद्ध घरच्या मैदानावरील त्याचा टी-20 मालिकेत पराभव झाला. विश्वचषक आणि श्रीलंकाविरुद्ध खराब कामगिरीनंतर सरफराजवर कर्णधारपद सोडण्याचा दबाव टाकण्यात येत आहे. आणि राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत सिंधचे कर्णधारपद न मिळाल्याने अजून अफवा पसरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>