Thursday, 01 Oct, 9.10 pm लेटेस्ट ली

होम
Raj Thackeray On Hathras Case: हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत व्यक्त केला रोष

Raj Thackeray (Photo Credits: File Photo)

Raj Thackeray On Hathras Case: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित कुटुंबातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कॅन्डल मार्चसह आंदोलने सुद्धा लोकांकडून केली जात आहे. राजकीय मंडळींपासुन ते सामान्य व्यक्तीच्या मनाला या घटनेमुळे धक्का बसला असून या घटनेचा सर्वांकडून निषेध करत आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerayयांनी सुद्धा हाथरस मधील प्रकरणासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्विट मध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भावनांसह तेथील सरकारच्या विरोधात रोष ही व्यक्त केला आहे. (Hathras Case: केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले करणार हाथरस चा दौरा; आरोपींना फाशी देण्याची मागणी)

राज ठाकरे यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील बलात्काराची घटना आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू हे मन विषण्ण करणारे आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे पीडितेचा मृतदेह परिवाराला न देता परस्पर त्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार करणे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोलीस आणि प्रशासनाला नेमके काय लपण्याचा प्रयत्न करत आहेत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे.

ऐवढेच नाही तर पीडित मुलीच्या परिवाराला कोणी भेटायला जात आहे तर त्यांना अडवले जात आहे. धक्काबुक्की केली जात आहे. यावरुन सरकारला कशाची भीती वाटत आहे असे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या बाजूने हे विधान केल्याचे दिसून येत आहे.(काँग्रेस खासदार राहुल गांधी Hathras येथे पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे राज्यातील नेते मंडळींकडून निषेध व्यक्त; पहा ट्विट्स)

पुढे असे ही राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करुन त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का? सर्व माध्यमातून उत्तर प्रदेशातील सरकारवर आज का तुटून पडत नाही आहेत? त्यांना जाब का विचारला जात नाही असा ही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे. हाथरस मधील घटना ही पाशवी आहे. पण अशा पद्धतीच्या घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त केल्यानंतर पुढे शांत बसायचे हे होऊन चालणार नाही. या वेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे असे ही राज ठाकरे यांनी म्हणत टीका केली आहे.

दरम्यान, पीडिता जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाताना तिच्यावर 4 पुरुषांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली गेली. यामध्ये पीडितेचा अमानुषपणे छळ ही केला गेला. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आता हाथरस मधील या घटनेचा देशातील सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top