Friday, 22 Jan, 7.13 pm लेटेस्ट ली

मनोरंजन
Sara Ali Khan Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चा एरियल योगा व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण; पहा व्हिडिओ

Sara Ali Khan Workout (PC - Instagram)

Sara Ali Khan Workout बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूपचं अ‍ॅक्टिव असते. ती आपल्या चाहत्यांसाठी स्वत: संदर्भातील सर्व अपडेट शेअर करत असते. सध्या ती आपल्या कुटूंबियांसह मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. साराने या सुट्टीदरम्यानची काही छायाचित्रेही तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हे फोटोज तिच्या चाहत्यांना खूपचं आवडले आहेत. आता सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एरियल योगा करताना दिसत आहे.

सारा अली खानची स्टाईल चाहत्यांना खूपचं आवडली आहे. या दरम्यान सारा अली खानने ब्लॅक टॉप आणि गुलाबी शॉर्ट परिधान केली होती. या व्हिडिओला काही तासांत 11 लाखाहून अधिक दृश्ये मिळाली आहेत. हजारो लोकांनी यावर भाष्य केले आहे. (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या वेडिंग सेलिब्रेशनला आजपासून सुरुवात; पहा लग्नसोहळ्याच्या तयारीचे खास Photos)

साराने यापूर्वीही तिच्या कुटूंबासह सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिमसोबत दिसली होती.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती 'कुली क्रमांक 1' मध्ये दिसली होती. यात सारा आणि वरुण धवनची जोडी सर्वांनाचं पसंत पडली होती. याशिवाय समीक्षकांकडून या चित्रपटाला विशेष पुनरावलोकन मिळाले नाही. आगामी काळात सारा अक्षय कुमारच्या 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top