Friday, 15 Nov, 3.46 pm लेटेस्ट ली

क्रीड़ा
स्वतः शून्यावर बाद झाला तरी विराट कोहली याने मयंक अग्रवाल याला 200 धावा करण्यासाठी दिले प्रोत्साहन, पाहा Video

(Photo Credit: Twitter)

भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि अजिंक्य रहाणे यांनी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या झटपट बादानंतर भारताचा डाव सावरला आणि मोठी धावसंख्या उभारली. मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये परतलेला भारतीय कर्णधार क्वचित असं शून्यावर बाद झाला. टीमसह विराटच्या चाहत्यांसाठीही ही एक धक्कादायक बाद होती. यानंतर मयंकने स्टाईलमध्ये 150 धावांची मजल मारली. तैजुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर मयंकने चौकार मारत टीम इंडियाच्या सलामी फलंदाजाने टेस्ट कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. दीडशे धावांचा टप्पा गाठल्यानंतर भारतीय सलामी फलंदाजाने ड्रेसिंग रूमच्या दिशेने आपली बॅट उंचावली आणि भारतीय संघात सेलिब्रेशन सुरु झाले. पण, यादरम्यान एक वेगळेच दृश्य समोर आले. कोहलीने मयंकला त्याच्या या कामगिरीसाठी शुभेच्छा दिली नाही आणि अग्रवालला धावांमध्ये आणखी 50 धावा जोडण्याचे साकेत दिले. ( IND vs BAN 1st Test Day 2: मयंक अग्रवाल सुसाट, तिसरे टेस्ट शतक करत विजय मर्चंट यांची केली बरोबरी, जाणून घ्या )

दिवसाच्या सुरुवातीला विराट लवकर बाद झाला. 2 चेंडूंचा सामना करत विराट शून्यावर माघारी परतला. पण, यामुळे अन्य फलंदाजांवर परिणाम झाला नाही. मयंक आणि रहाणेने 190 धावांची भागीदारी करत संघाच्या 300 धावांत महत्वाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी दीडशे धावा केल्यानंतर अग्रवाल उत्सव साजरा करत असताना कोहलीने सलामी फलंदाजाला फलंदाजी सुरू ठेवण्याचा आणि डाव दुहेरीच्या रूपात रूपांतरित करण्याचा आग्रह धरताना ड्रेसिंग रूमवरून संकेत दिले. विराटच्या या संदेशाला मयंकने थम्स अप करत प्रतिसाद दिला. पाहा 'हा' व्हिडिओ:

मयंकने बांग्लादेशविरुद्ध इंदोरच्या होळकर स्टेडियमवर 183 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह शतक झळकावले. यापूर्वी मॅचच्या पहिल्या दिवशी मयंकने 98 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते, ज्यात 9 चौकारांचा समावेश होता. मयंकने आपल्या पाचव्या कसोटी सामन्यात शतक झळकावले, जे त्याने दुहेरी शतकात रूपांतरित केले. मयंकने दक्षिण आफ्रिकाविरूद्धविशाखापट्टणममध्ये 215 धावा केल्या होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>