Saturday, 14 Dec, 5.10 pm लेटेस्ट ली

होम
ठाकरे मंत्रिमंडळातील खातेवाटपात 48 तासांच्या आत बदल; जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना मिळाले 'हे' खाते

Uddhav Thackeray Cabinet Changes (PC-Twitter)

Uddhav Thackeray Cabinet Changes: ठाकरे सरकारचे गुरुवारी तात्पुरते खातेवाटप करण्यात आले होते. मात्र, 48 तासांच्या आत या खातेवाटपात बदल (Cabinet Changes) करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना आता जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्यांक विकास आणि कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. या खातेबदलास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. मात्र अदलाबदल झालेली खाते भुजबळ आणि पाटील यांच्याकडे तात्पुरती राहणार आहेत की, कायमस्वरुपी हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या बदलानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. (हेही वाचा - महाविकास आघाडी चं खातेवाटप जाहीर; एकनाथ शिंदे यांच्याकडे 9 खाती तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झाले होते. परंतु, गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचे काम रखडले होते. मात्र, आता गृह आणि नगरविकास खाते हे शिवसेनेला मिळाले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या वाट्याला वित्त, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तसेच काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.

हेही वाचा - मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झाले खातेवाटप; जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते

दरम्यान, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्री, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कामकाज, माजी सैनिक कल्याण ही खाते देण्यात आली आहेत. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि खणीकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा ही खाते देण्यात आली आहेत. तसेच नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालविकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top