Monday, 23 Mar, 2.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
Vodafone कडून नवे First Recharge प्रीपेड प्लॅन लॉन्च, किंमत 97 रुपयांपासून सुरु

Vodafone (Photo Credit Which.co.uk)

टेलिकॉम कंपनी वोडाफोन यांनी त्यांच्या युजर्ससाठी प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. लॉन्च करण्यात आलेले हे प्लॅन वोडाफोन नेटवर्कमध्ये पोर्ट करण्यासाठी युजर्सला उललब्ध करुन देण्यात आलेले आहेत. कंपनीने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 5 नवे FRC सादर केले आहेत. याची किंमत 97 रुपये, 197 रुपये, 297 रुपये, 497 रुपये आणि 647 रुपये आहे. तर वोडाफोनने त्यांच्या युजर्साठी काही दिवसांपूर्वी डबल डेटा बेनिफिट्सचे प्लॅन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.वोडाफोनच्या 97 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 45 रुपयांचा टॉकटाइम, 100 एमबी 2G/3G/4G डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 1 पैसा प्रति सेकंद या दराने कॉलिंग चार्जेस द्यावे लागणार आहेत. याची वैधता 28 दिवसांची असणार आहे. तर 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अन्य नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग करता येणार आहे. तसेच 2जीबी डेटा आणि 300 एसएमएस पाठवता येणार आहेत.

तर 297 रुपयांच्या रिजार्चमध्ये डबल डेटा बेनिफिट्सची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये 3 जीबी डेटा प्रति दिवसासाठी दिला जाणार आहे. तसेच अन्य नेटवर्कवर अनलिमिडेटा कॉलिंग करता येणार आहे. 100SMS पाठवता येणार असून या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवस आहे. तसेच 497 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा, 100 एसएमएस सुविधा असून 56 दिवसांची याची वॅलिडिटी आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सला Vodafone Play चे आणि Zee5 चे सब्सक्रिप्शन फ्री देण्यात येणार आहे. त्याचसोबत वोडाफोनच्या 647 रुपयांच्या रिचार्जमध्ये अन्य नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग करता येणार आहे. तसेच 1.5 जीबी डेटा प्रतिदिन दिला जाणार आहे. 100 एसएमएस पाठवता येणार असून याची वॅलिडिटी 84 दिवसांची असणार आहे.(खुशखबर! Reliance Jio ने जुन्या प्लान्समध्ये दिला दुप्पट डेटा, जिओ ची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर)

वोडाफोनच्या डबल डेटा अंतर्गत 3GB डेटा युजर्सला देण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 28 दिवसांसाठी 84GB डेटा दिला जाणार आहे. ही ऑफर सर्व 22 टेलिकॉम सर्कल्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ही युजर्सला मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top