Sunday, 19 Jan, 8.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
WhatsApp Down झाल्याने Twitter च्या माध्यमातून युजर्स व्यक्त करत आहेत मजेशीर प्रतिक्रिया, पाहा ट्विट

WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

घड्याळ्याच्या काट्याप्रमाणेच जगभरातील लोकांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनलेला WhatsApp Down झाल्याने युजर्सचा एकच गोंधळ उडाला आहे. WhatsApp Down झाल्याने युजर्सला फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करायला अनेक अडचणी येत आहेत. तर काहींना WhatsApp स्लो झाल्यामुळे Memes च्या माध्यमातून त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. हा मीम्सचा पाऊस अनेक युजर्स Twitter च्या माध्यमातून करत आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची माहिती मिळत आहे.

आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यास अडचणी येत आहेत. फोटोज, जीआयएफ, स्टीकर्स, व्हिडिओ पाठवण्यात अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ, स्टीकर्स, अन्य फाइल्स डाऊनलोड करण्यासही अडचणी येत आहेत. काही युजर्सना टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यातही अडचणी येत असल्याचे समजते.

पाहा मजेशीर प्रतिक्रिया:

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप भारतातील काही भाग, ब्राझीलमधील काही भाग, मध्य आशियातील काही भाग, युरोपमधील काही भाग आणि संयुक्त अरब आमिरातीच्या काही भागात डाऊन आहे, अशी माहिती 'डाऊनडिटेक्टर डॉट इन' या संकेतस्थळाकडून देण्यात आली. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर यासंदर्भातील ट्रेड सुरू केला आहे. तर अनेकांनी या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. तर काही जणांनी यावर मिम्स बनवून ट्विटरवर शेअर केले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top